रऊफ बँड पथकावर कारवाईची मागणी – भाजपा अमळनेरचे पोलीस निरीक्षकांना निवेदन..


अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – चोपडा तालुक्यातील धानोरा येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर फसवून अत्याचार केल्याच्या प्रकरणात अमळनेर शहरातील प्रसिद्ध रऊफ बँड पथकाचा मालक असलम अली (वय 29, रा. सराफ बाजार, अमळनेर) याच्यावर चोपडा पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणानंतर भारतीय जनता पार्टी अमळनेरच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित बँड पथकावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भाजपच्या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, या गुन्ह्यात रऊफ बँड पथकाच्या वाहनाचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले असून, सदर गाडी जिल्हाभर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत फिरत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी तात्काळ ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच असलम अली आणि त्याचे सहकारी यांचे मोबाईल ताब्यात घेऊन सीडीआर तपासणी करून सखोल चौकशी करावी व कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा गुन्ह्यांना आळा बसेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सदर घटनेमुळे अमळनेर शहरात संतापाची लाट उसळली असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने त्वरीत कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या वेळी भाजपा जानवे मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, मंडल अध्यक्ष राहुल पाटील, शहराध्यक्ष योगेश महाजन, माजी नगरसेवक श्याम पाटील, विक्रांत पाटील, संजय पाटील, शिवसेना (शिंदे गट) तालुका प्रमुख सुरेश पाटील, युवा मोर्चाचे देवा लांडगे, समाधान पाटील, अक्षय चव्हाण, दर्पण वाघ, मनोज शिंगाणे, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार, अक्षय पाटील, उज्वल मोरे, विठ्ठल पाटील, प्रेम पाटील, देव गोसावी, संतोष पाटील, संजय पाटील यांच्यासह शेकडो नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.