देशात पुन्हा कोरोनाचे संकट; रुग्णसंख्या १००० पार, सर्वाधिक रुग्ण केरळ, महाराष्ट्रात २०९


24 प्राईम न्यूज 27 May 2025
देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने (कोविड-१९) डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. ताज्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत १००९ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून गेल्या पाच ते सहा दिवसांत तब्बल ७५२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण असून तेथील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३० वर पोहोचली आहे. महाराष्ट्रात २०९, तर दिल्लीत १०४ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत गेल्या एका आठवड्यात ९९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, ज्यामुळे राजधानीसह देशातील अन्य प्रमुख शहरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेशात १५, पश्चिम बंगालमध्ये १२, गुजरातमध्ये ८३ आणि कर्नाटकात ४७ सक्रिय रुग्ण सापडले आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासन सजग झाले असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सावध राहा, सुरक्षित राहा!