मंत्रालयाने दिला इशारा: पुढील ३ तासांत जोरदार वादळी पावसाचा धोका!

24 प्राईम न्यूज 28 May 2025

मंत्रालयाने हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील ३ तासांत ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. यासोबतच मध्यम स्वरूपाच्या वादळासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामानाच्या या तीव्र बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. उघड्यावर जाणे टाळावे, सुरक्षित स्थळी थांबावे, वीज पडण्याच्या शक्यतेमुळे झाडांच्या खाली थांबण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.