अमळनेर मध्ये १० कोटींच्या क्रीडा प्रकल्पांचे लोकार्पण. आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन..


आबिद शेख/अमळनेर
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील क्रीडा संकुलामधील नवीन बहुउद्देशीय हॉल, जुना बहुउद्देशीय हॉल आणि ४०० मीटर धावपट्टीचा लोकार्पण सोहळा येत्या २९ मे रोजी सकाळी ११ वाजता पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार स्मिता वाघ, तसेच माजी मंत्री व आमदार अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.

आमदार अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या प्रकल्पासाठी १० कोटी ६६ लाख ९८ हजार रुपयांची सुधारीत मान्यता मिळाली असून, त्यापैकी ३ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे.
या निधीतून १ कोटी ५० लाख रुपये खर्चून ४०० मीटर धावनमार्गाचे नूतनीकरण, जुना बहुउद्देशीय हॉलची दुरुस्ती, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल व स्केटिंग मैदान उभारण्यात आले आहे.
तर उर्वरित १ कोटी रुपयांमधून कुस्ती, ज्युडो आणि कबड्डी अशा पारंपरिक व आधुनिक खेळांसाठी नवीन हॉलची निर्मिती करण्यात आली आहे.
या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आणि तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.