अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त महिलांसाठी मॅरेथॉन आणि वॉकेथॉनचे आयोजन..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त स्मितोदय फौंडेशन तर्फे आणि मुंदडा फौंडेशनच्या सहकार्याने महिलांसाठी भव्य मॅरेथॉन व वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १ जून रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर येथून सुरू होणार आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट महिलांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीची जाणीव निर्माण करणे तसेच त्यांना सक्षम बनविणे हे आहे. या स्पर्धेत ३५ वर्षांपर्यंतच्या तरुणींकरिता २.५ किमी धावण्याची तर ३५ वर्षे वयावरील महिलांसाठी ५ किमी चालण्याची शर्यत आयोजित करण्यात आली आहे.

प्रत्येक स्पर्धेत प्रथम पाच विजेत्यांना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असून, सर्व सहभागी महिलांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

या उपक्रमात अधिकाधिक महिलांनी व तरुणींनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्मितोदय फौंडेशनच्या खासदार स्मिता वाघ व भैरवी वाघ-पलांडे यांनी केले आहे.

नोंदणी व अधिक माहितीसाठी खालील संयोजकांशी संपर्क साधावा:

  • अमेय मुंदडा – 8600505545
  • संजय पाटील – 9422734106
  • सुनील वाघ – 9579294827
  • माधुरी पाटील – 8208407378
  • रंजना देशमुख – 9422716950
  • प्रा. शिला पाटील – 9422409959
  • स्नेहा एकतारे – 9423902965
  • वसुंधरा लांडगे – 9689037841
  • स्वप्ना पाटील – 8805583355

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!