अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य सभासद-ग्राहक मेळावा; -सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण.

0

आबिद शेख/अमळनेर
अमळनेर (प्रतिनिधी) – अमळनेर को-ऑप. अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त एक भव्य सभासद व ग्राहक मेळावा दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात बँकेच्या आधुनिक सुविधांनी युक्त नूतनीकरण केलेल्या भव्य इमारतीचे लोकार्पण राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब मोहनराव पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

या समारंभाचे अध्यक्षस्थान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव रघुनाथ पाटील भूषविणार आहेत. या वेळी प्रति पंढरपूर वाडी संस्थानचे गादीपती प.पू. ह.भ.प. संत प्रसाद महाराज यांची आशिर्वादपर उपस्थिती लाभणार आहे.

तसेच जलसंपदा मंत्री ना. गिरीश दत्तात्रय महाजन, खासदार स्मिता उदय वाघ, माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते बँकेच्या विविध दालनांचे उद्घाटन होणार आहे. आमदार अमोल चिमणराव पाटील व आमदार सत्यजित सुधिर तांबे यांच्या हस्ते विविध सभासद, ग्राहक व ठेवीदारांचा सन्मान करण्यात येणार आहे.

कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कृषिभूषण साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी, तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वासराव ठाकूर, अर्बन बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, जळगाव जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रहास गुजराथी, सहकार भारतीचे संघटन मंत्री दिलीप रामू पाटील, सहकार आयुक्त दीपक तावरे, विभागीय सहनिबंधक संभाजी निकम, सहकार भारती प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय बिर्ला, जिल्हा निबंधक गौतम बालसाने, अमळनेर सहाय्यक निबंधक कुणाल सोनार, व्ही.एम. जगताप आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास अमळनेर अर्बन बँकेचे सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हॉइस चेअरमन रणजित शिंदे, तसेच संचालक मंडळातील प्रविण जैन, लक्ष्मण महाजन, भरतकुमार ललवाणी, प्रदीप अग्रवाल, दीपक साळी, अभिषेक पाटील, प्रविण पाटील, पंडित चौधरी, मोहन सातपुते, सौ. वसुंधरा लांडगे, डॉ. मनीषा लाठी, अँड. व्ही.आर. पाटील, अँड. विजय बोरसे व बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!