अमळनेरला मिळाले भव्य तालुका क्रीडा संकुल : ग्रामीण युवकांना नवे व्यासपीठ. -पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन.

आबिद शेख /अमळनेर

अमळनेर मध्ये आज भव्य तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या सोहळ्याला सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “क्रीडा म्हणजे केवळ शारीरिक व्यायाम नव्हे, तर ती नेतृत्व, सहकार्य आणि आत्मविश्वास निर्माण करणारी प्रक्रिया आहे. अशा प्रकारचे संकुल ग्रामीण भागातील युवकांना उभारी देणारे ठरेल. या संकुलातून उद्याचे ऑलिम्पिक खेळाडू घडावेत, हीच अपेक्षा आहे.”
यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी “गावागावातली युवाशक्ती जर योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्यास गाव, राज्य आणि देश बदलू शकतो,” असे मत मांडले.
आमदार अनिल पाटील यांनी या संकुलामुळे तालुक्यातील क्रीडा संस्कृतीला मोठा बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या क्रीडा संकुलात कुस्ती, कराटे, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम, योग, मार्शल आर्ट्स यासाठी स्वतंत्र हॉल, ४०० मीटर धावपट्टी, बास्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग आणि ओपन जिम यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याचा लाभ विद्यार्थ्यांपासून युवकांपर्यंत सर्वांना मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी दिली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिलेले स्केटिंगचे प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी केले हा प्रकल्प अमळनेर तालुक्याच्या क्रीडा विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 995/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **