राज्यस्तरीय हॉकी निवड चाचणीसाठी रीतिमा व रशीला बारेला यांची जळगाव जिल्हा तर्फे निवड…

24 प्राईम न्यूज 29 May 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 95500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87500/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71500/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 995/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

१५ वी हॉकी इंडिया सब ज्युनिअर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप जी ३ ते १४ जुलै रोजी राची येथे होत आहे. त्यासाठी हॉकी महाराष्ट्र तर्फे महाराष्ट्र राज्याचा संघ पुणे येथे निवडला जाणार असून या निवड चाचणी साठी जळगाव जिल्ह्यातील १५ वर्षातील दोन उत्कृष्ट खेळाडूंची निवड आज श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे करण्यात आली व त्यांना निरोप देण्यात आला.
दोन्ही खेळाडूंना महाराष्ट्र हॉकी च्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्यातर्फे हॉकी स्टिक देऊन गौरविण्यात आले तसेच हॉकी जळगाव तर्फे फारूक शेख यांनी आवश्यक त्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
यावेळी हॉकी जळगाव चे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, संचालिका वर्षा सोनवणे व पोलीस दलाची राष्ट्रीय खेळाडू किरण भिसे यांची उपस्थिती होतीनिवड झालेले खेळाडू1) रितिमा पंचनाल बारेला2) रशीला बन्सीलाल बारेला
शासकीय आश्रम शाळा वैजापूर ता. चोपडा जि. जळगाव