राजमाता अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अमळनेर भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन..

0


आबिद शेख/अमळनेर
अखंड भारताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या, न्यायप्रिय आणि जनसेवेस समर्पित राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी (300वी) जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, अमळनेरच्या वतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10 वाजता बसस्थानकाजवळील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिवादन प्रसंगी राजमातांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

यानंतर समाजहिताच्या दृष्टिकोनातून आयोजित रक्तदान शिबिरात भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या माध्यमातून राजमातांच्या “जनसेवेचा आदर्श” प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

दुपारी कपिलेश्वर मंदिरात महाआरतीचे आयोजन करण्यात आले. हे मंदिर राजमातांनी स्वतःच्या प्रयत्नातून जीर्णोद्धार केलेले असून त्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. मंत्रोच्चार, भक्तिगीते आणि महाआरतीने परिसर भक्तिमय झाला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून फक्त स्मृती जागवण्यापुरते मर्यादित न राहता, नव्या पिढीपर्यंत राजमातांचे विचार व आदर्श पोहोचवण्याचा भाजप अमळनेरचा उद्देश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!