अमळनेर पोलीस उपनिरीक्षक निंबा शिंदे यांचा सेवा निवृत्तीप्रसंगी सत्कार..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : येथील पोलीस उपनिरीक्षक निंबा देवराम शिंदे यांचा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि निस्वार्थ सेवेनंतर निवृत्तीबद्दल पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निंबा शिंदे यांना तीन वर्षांपूर्वी पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यांनी तब्बल बारा वर्षे अमळनेर बसस्थानकावर कर्तव्य बजावत नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला. त्यांच्या प्रामाणिक आणि निष्ठावान सेवेचेच प्रतीक म्हणून पदोन्नतीनंतर देखील त्यांना त्याच ठिकाणी म्हणजे अमळनेर बसस्थानकावरच नियुक्ती देण्यात आली होती.
सेवानिवृत्ती निमित्त पोलीस अधीक्षक, अमळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, अमळनेर आगारातील कर्मचारी, बसस्थानकावरील रिक्षा चालक तसेच दुकानदारांनी त्यांचा निरोप घेऊन सन्मानित केले. त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल परिसरात विशेष कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.