तालुक्याची आमसभा झालीच पाहिजे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची ठाम मागणी..

0


आबिद शेख/अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

– सध्या राज्यातील राजकीय पक्षांतर्गत बदलांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची मासिक सभा अमळनेर येथील नावीन्य हॉस्पिटलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद पांडुरंग पाटील होते, तर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.

सभेत सर्वानुमते ठरविण्यात आले की, अमळनेर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून काम करेल. सत्ताधाऱ्यांकडून शहर व तालुक्यात सुरू असलेल्या अकार्यक्षम कारभाराविरोधात आवाज उठवण्यात येईल, आंदोलन छेडले जाईल आणि स्थानिक समस्यांवर ठाम भूमिका घेतली जाईल.

येत्या नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष जोमाने आणि जिद्दीने सहभागी होईल, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

सभेचे सूत्रसंचालन निवृत्त माध्यमिक शिक्षक श्री. डी. एम. पाटील यांनी केले. प्रास्ताविक श्री. उमेशदादा पाटील यांनी सादर केले. ॲड. शकील काझी, जाकीर शेख, अनंत निकम, शेख रफिक हाजी, प्रशांत निकम यांनी यावेळी आपली मते मांडली.

यानंतर प्रा. अशोक पवार आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पुढील वाटचालीसाठी दिशा दिली.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकदिलाने आणि झोकून देऊन काम करण्याचे आवाहन केले. शेवटी आभार प्रदर्शनानंतर ही सभा यशस्वीरित्या संपन्न झाली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!