लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी नोकरदार! राज्य सरकारची ३ कोटी ५८ लाखांची फसवणूक उघड..

0

24 प्राईम न्यूज 31 May 2025


मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरवापर केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. राज्यातील २,६५२ महिला सरकारी कर्मचाऱ्यांनी ही योजना अपात्र असूनही त्याचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. या महिलांनी ऑगस्ट २०२४ ते एप्रिल २०२५ दरम्यान प्रत्येकी १३,५०० रुपये असे एकूण ३ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान घेतले आहे.

ही माहिती मिळाल्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्याने १ लाख ६० हजार ५५९ सरकारी कर्मचाऱ्यांचा यूआयडी डेटा तपासला. त्यातून वर्ग ३ आणि वर्ग ४ मधील अनेक महिला कर्मचारी अपात्र असूनही लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले.

शासन निर्णयात अगोदरच स्पष्ट करण्यात आले होते की सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, तरीही काही महिलांनी चुकीची माहिती देत अर्ज सादर करून रक्कम उचलली.

आता प्रशासनाने या सर्व २,६५२ महिला कर्मचाऱ्यांकडून ३ कोटी ५८ लाख रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच सर्व शासकीय विभागांना आदेश दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तसेच, अतिरिक्त ६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांची पडताळणीही करण्यात येणार आहे, जेणेकरून आणखी अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!