अमळनेर तालुका सकल धनगर समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ३०० वी जयंतीनिमित्त उपक्रम..

आबिद शेख/अमळनेर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यांच्या स्मरणार्थ केंद्र शासनाकडून ३०० रुपयांचे विशेष नाणे प्रकाशित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, राज्य सरकारनेही त्यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन अभिवादन केले आहे.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
या पार्श्वभूमीवर, जळगाव जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली असून, ३०० किलोमीटरची चारचाकी वाहनांची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. या ऐतिहासिक जयंतीनिमित्त अमळनेर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

“आपल्या छोट्याशा योगदानाने कोणाचा अमूल्य जीव वाचू शकतो, त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करण्यासाठी पुढे यावे,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ज्या नागरिकांना रक्तदान करायचे असेल त्यांनी आपली नोंदणी पुढील क्रमांकावर करावी –
📞 ९४२३९३४५७७
📞 ९७३०८३६८३०
रक्तदात्यांची योग्य ती काळजी घेता यावी यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे, असेही आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
— अमळनेर तालुका सकल धनगर समाज