अमळनेरात आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा; सायंकाळी ४ वाजता सुरुवात..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर — पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर येथील सकल धनगर समाजाच्या वतीने आज, दिनांक ३१ मे रोजी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही शोभायात्रा आज दुपारी ४ वाजता चोपडा नाका येथून प्रारंभ होऊन, विविध प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत रात्री ८ वाजता बस स्थानक चौकातील अहिल्याबाई होळकर स्मारकावर समाप्त होणार आहे.
कार्यक्रमाच्या सांगता स्थळी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील उपस्थित राहून नागरिकांना संबोधित करतील. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, माल्यार्पण व सामूहिक अभिवादन होणार आहे.
सकल धनगर समाज, अमळनेर यांच्या वतीने सर्व समाजबांधवांना या शोभायात्रेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.