वक्फ कायद्याविरोधात जळगावा त महिलांची मानव साखळी आज संध्याकाळी ४ ते ५

24 प्राईम न्यूज 1 Jun 2025


वक्फ कायदा २०२५ हा संविधान व धार्मिकदृष्ट्या चुकीचा असल्याने त्याला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनला बोर्डातर्फे न्यायालयात व लोकशाही मार्गाने रस्त्यावर विरोध करण्यात येत आहे.
या कायद्याला विरोध म्हणून जळगाव वक्फ बचाव समितीतर्फे जळगाव शहरात १ जून रविवार रोजी संध्याकाळी ४ ते ५ या वेळात शिवाजीनगरच्या रेल्वे पुलावर महिलांची मानव साखळी तयार करण्यात येऊन या कायद्याला विरोध करण्यात येणार असल्याचे वक्फ बचाव समितीचे अध्यक्ष मुफ्ती खालीद मुफ्ती रमिज,व समन्वयक फारूक शेख यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.
महिलांसाठी विशेष सूचना
शिवाजीनगर, उस्मानिया पार्क, गेंदालाल मिल या परिसरातील महिलांनी रेल्वे स्टेशन पाठीमागील शिवाजीनगर पुलाखाली एकत्रित जमावे तसेच जळगाव शहरातून इस्लामपुरा, मन्यार वाडा, जोशी पेठ, शाहूनगर, अक्सा नगर, मेहरून येथील महिलांनी टावर समोरील जुन्या जिल्हा परिषद इमारती च्या पुलाखाली एकत्रित जमावे त्यानंतर पुढील मानव साखळी तयार करण्यात येईल.
पाऊस असला तरी विरोध दर्शवीणार
हल्ली पावसाचे वातावरण असल्याने जरी ठराविक वेळेत पाऊस आला तरी भर पावसात या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी ही मानव साखळी आपला विरोध दर्शवीणार असल्याचे सुद्धा पत्रकात नमूद केलेले आहे.