भंगार बाजार गरीब व्यावसायिकाच्या जीवनाशी खेळू नका—- अल्पसंख्यांक शिष्टमंडळाची मागणी….

0

जळगाव ( प्रतिनिधि)
जळगाव शहरातील ६०० चौरस मीटर जागेवर ११७ भंगार व्यवसाय करणारे व्यावसायिकांना तत्कालीन नगरपालिकेने प्रस्थापित केले होते. १९९२ पासून ते आजपावेतो ते इमाने एतबारे आपला व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे.

९९ वर्षाचा करार परंतु प्रशासनाची उदासीनता
तत्कालीन नगर पालिकेने

१९९७ ला ९९वर्षाचा करार करून ठरावाला शासनाची मान्यता न घेतल्याने तो ठराव जळगाव शहर महानगरपालिकेने २०१९ ला विखंडित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर एक समिती गठीत केली त्या समितीच्या अहवालावर १९९७ चा नगरपालिकेचा ठराव रद्द करण्याचे मान्य केले. वास्तविक पाहता गठीत समिती चार पैकी २ सदस्यांनी राजीनामा दिला होता परंतु समितीचा खोटा अहवाल लावण्यात येऊन तो ठराव रद्द केला.

जलगावात अद्याप ९९ वर्षाचे ठराव अस्तित्वात आहे

जळगाव शहरात आजही ९९ वर्षाचे करार असलेले सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक संस्था व संघटनांना ९९ वर्षाच्या कराराने व नाममात्र १/- रुपया दराने भूखंड दिलेले आहे त्या भूखंडाच्या माध्यमाने वाणिज्य सह व्यावसायिक कार्य सुद्धा केले जात आहे अशा भूखंडावर कार्यवाही न करता गरीब ११७ व्यवसायिकांवर मनपाने कारवाई करण्याचा बडगा उभारलेला आहे.
शासन सह मनपा व गटनेते यांना निवेदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री तसेच अल्पसंख्यांक मंत्री, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी जळगाव, मुख्य सचिव, प्रधान सचिव नगर विकास मंत्रालय व आयुक्त सह महापौर व सर्व गटनेते यांना जळगाव शहरातील सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील अल्पसंख्यांक प्रतिनिधी एकत्रित येऊन एक निवेदन दिले असून भंगार बाजारातील गरिबांच्या जीवाशी खेडू नका अशी आर्त हाक देऊन मागणी केलेली आहे की या भंगार बाजाराला शासनाची मान्यता घेउन त्यांना तिथेच उद्योग करून व आपले कुटुंबाचे उदर निर्वाह करू द्या.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश

शिष्टमंडळात मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख,कुल जमातीचे अध्यक्ष सय्यद चांद, मनसेचे अध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी चे अध्यक्ष मझहर पठाण,एमआयएमचे अध्यक्ष अहमद हुसेन, शिवसेना महानगर अध्यक्ष झाकीर पठाण व मतीन सय्यद, राष्ट्रवादी प्रसिद्धीप्रमुख सलीम इनामदार, समाजवादी पार्टी अध्यक्ष रईस बागवान,युवा मणियार अध्यक्ष मोहसीन युसूफ, ए यु सिकलगर फाउंडेशन अध्यक्ष अन्वर खान, सिकलगर बिरादरी चे मुजाहिद खान, तांबापुर फाउंडेशनचे मतीन पटेल, मुस्लिम इदगाह ट्रस्टचे अनिस शहा, कलाम सोसायटीचे कासिम उमर आदींचा सहभाग होता..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!