कवयित्री बहिणाबाई चौधरी उमविच्या गुणवत्ता परिक्षेत शिरपूर येथील सैय्यद आरजु सुवर्णपदक ची मानकरी…

शिरपूर (प्रतिनिधि)येथील आर सी पटेल एज्युकेशनल ट्रस्ट आर सी पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील पदव्युत्तर व पदवी विभागातील विद्यार्थ्यांनी सैय्यद आरजु सह ११ विद्यार्थी सन २०

२२ ,२३ या वर्षीच्या परिक्षेत विद्यापीठ गुणवत्ता यादीत झडकले
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने घेतलेल्या परिक्षेत गुणवत्ता

यादीत शिरपूर येथील आर सी पटेल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सैय्यद आरजु जाकिर अली याने २००० पैकी १९६५ गुणांसह विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन सुवर्णपदक पटकावले तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे माजी शिक्षण मंत्री अमरेश भाई पटेल, संस्थेच्या अध्यक्ष भुपेश भाई पटेल, चेअरमन राजगोपाल भंडारी , प्राचार्य डॉ डि आर पाटील, उपप्राचार्य ए एम पाटील,सह आदिनीं कौतुक केले