अमळनेरात दगड फेक. तणावपूर्ण शांतता…

अमळनेर (प्रतिनिधि) अंमळनेर येथिल भांडरकर गल्ली जवळ १६ रोजी रात्रि १० वाजेच्या सुमारास एका महा पुरुषाच्या फ्लक लावण्या वरून दोन समाजात वाद होऊन तुफान दगड फेक झाल्याची घटना घडली घटनेचे वृत्त कळताच पोलिस उप विभागीय अधिकारी राकेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली पो नी विजय शंदे यांच्या टीम ने परिस्थिती वर नियंत्रण मिळविले तरी परस्थिती तणावपूर्ण शांतता आहे. या आधीही अमळनेरात बॅनर च्या मुद्यावरून मोठा वाद झाला होता नगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बॅनर लावणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.