अमळनेरमध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी मॅरेथॉन आणि वॉकेथॉन स्पर्धा यशस्वी; ज्योती महाजन व वैशाली पाटील विजयी

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने भारतीय जनता पक्ष, स्मितोदय फाऊंडेशन आणि मुंदडा बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने मॅरेथॉन व वॉकेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मॅरेथॉन गटात ज्योती बापू महाजन तर वॉकेथॉन गटात वैशाली संदीप पाटील यांनी पहिला क्रमांक पटकावला.

या स्पर्धेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथून करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, ज्येष्ठ महिला नेत्या रजनीताई केले, स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा भैरवी वाघ-पलांडे आणि अमेय मुंदडा यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात झाली.
मॅरेथॉन स्पर्धेतील विजेते:
- प्रथम क्रमांक : ज्योती बापू महाजन
- द्वितीय : ऋतुजा सुरेश पाटील
- तृतीय : गीतांजली नितीन पाटील
- उत्तेजनार्थ : रितुजा गोपाल पाटील, ममता सुनील ठाकरे
वॉकेथॉन स्पर्धेतील विजेते:
- प्रथम क्रमांक : वैशाली संदीप पाटील
- द्वितीय : रोहिणी कृष्णकांत शिरसाठ
- तृतीय : गीतांजली विशाल खैरनार
- उत्तेजनार्थ : माधुरी प्रवीण पाटील, वैशाली यशवंत ठाकरे
विजेत्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल शिंदे, राष्ट्रवादीच्या तिलोत्तमा पाटील, खा.शि. संचालक निरज अग्रवाल, माधुरी पाटील, शिला पाटील, स्वप्ना पाटील, स्नेहा एकतारे, भाजप ओबीसी प्रदेश अध्यक्षा भारती सोनवणे, भाजप मंडळ अध्यक्ष जिजाबराव पाटील, योगेश महाजन व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात प्रतिकूल परिस्थितीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इंदूबाई पवार, खोकरपाट येथील शंभू महिला शेतकरी गट, आणि दिव्यांग मुलींना मोफत शिक्षण देणाऱ्या सलमाबी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे यांनी केले. स्पर्धेचे पंच म्हणून तालुका क्रीडा समन्वयक सुनील वाघ, महेश माळी, संजय पाटील, प्रशांत वंजारी, जे. व्ही. बाविस्कर, गोकुळ बोरसे, सॅम शिंगाणे, राहुल पाटील यांनी जबाबदारी सांभाळली.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक विक्रांत पाटील, श्याम पाटील, महेश पाटील, राकेश पाटील, राहुल पाटील, निवास मोरे, दीपक पवार, देवा लांडगे, राहुल चौधरी, समाधान पाटील, प्रवीण पाटील, कल्पेश पाटील, सागर शेटे, समाधान राजपूत, घनश्याम पाटील, राजेश खराडे, अमोल पाटील, निखिल धनगर आणि निखिल पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.