अमळनेरमध्ये ‘रॉयल ट्रेडर्स’ चा भव्य शुभारंभ – बांधकाम साहित्याच्या खरेदीसाठी आता एक विश्वासार्ह नाव..

आबिद शेख/अमळनेर

– अमळनेर शहरातील धुळे रोडवरील पटेल जर्दा कंपनीच्या समोर “रॉयल ट्रेडर्स” या भव्य बांधकाम साहित्याच्या दुकानाचे उद्घाटन शनिवार, दिनांक ३१ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ८ दरम्यान उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. नगरसेविका सौ. सुगरा हञ्जन यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार अनिल पाटील, विनोद भ्यया, प्रवीण अनिल दादा, सरजू सेठ, विनोद पाटील, बिपिन बापू, शिरीष पाटील, राजेश बापू, सुभाष मामा,आलिम मुजावर, सलिम टोपी, शरीफ इंजिनियर, सतार सेठ, दबीर पठाण, जुलाल पाटील, हाजी शेखा मिस्तरी यांच्यासह अनेक मान्यवर, इष्टमित्र, कुटुंबीय आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“रॉयल ट्रेडर्स” या नव्या दुकानात के.एस., अंबुजा सिमेंट, एम वंडर, अल्ट्राटेक, बिर्ला सुपर, बिर्ला ए.१ यांसारख्या नामांकित ब्रँड्सचे सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य एकाच छताखाली उपलब्ध आहे.
या नव्या उपक्रमामुळे अमळनेरमधील बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांसाठी एक नवे, विश्वासार्ह केंद्र निर्माण झाले आहे.
हाजी शेखा मिस्तरी यांची रॉयल ट्रेडर्स ही चौथी फर्म असून, याआधी त्यांनी ‘रॉयल कन्स्ट्रक्शन’, ‘रॉयल फर्निचर’ आणि ‘एस.ए. कलेक्शन’ यशस्वीरित्या स्थापन केल्या आहेत. त्यांच्या यशाच्या या नव्या टप्प्याबद्दल अमळनेर परिसरातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे.