एम एच तडवी मंडल अधिकारी यांचा सेवा निवृत्त सत्कार समारंभ संपन्न..

प्रतिनिधी /मन्सूर तडवी


यावल ३१/५/२५ रोजी सावखेडा सिम येथील रहिवासी महम्मद हुसेन तडवी उर्फ (हनीफ आप्पा) यांचा सेवानिवृत्त सत्कार समारंभ तहसील विभाग नवीन इमारत हॉल येथे संपन्न झाला यावेळी यावल विधानसभा चे माजी आमदार रमेश दादा चौधरी तसेच फैजपूर विभागीय अधिकारी बबनराव काकडे. यावल येथील तहसीलदार मोहन माला नाझीरकर आणि महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच आसेमं टीम तडवी समाजातील मान्यवर व्यक्ती यांच्या उपस्थितीत संपन्न झाला तडवी यांची सेवा ८/१२/१९८९ रत्नागिरी कोकण पासून तर जळगाव जिल्ह्यात २०११ ला प्रथम साकळी शिरसाठ त्यानंतर आडगाव कासारखेडा येथे काही वर्ष तलाठी म्हणून त्यांनी सेवा बजावली त्यानंतर ते पदोन्नती होऊन २०२१ ला फैजपूर येथे मंडळ अधिकारी म्हणून सेवा केली त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याच कर्मचार्यांनी त्यांच बद्दल अनुभव व्यक्त केले शांत स्वभाव प्रेमळ मनमिळाऊ असे तडवी हे आज महसूल विभागातून सेवानिवृत्त होत आहेत असे मनोगत व्यक्त केले आणि तडवी यांचा परिवार सहित मानसन्मानाने सत्कार करण्यात आला तडवी यांना कर्मचाऱ्यांनी आराम खुर्ची म्हणून भेट देण्यात आली यावेळी समाजातील माजी जि.प. सदस्य मासूम तडवी. राजू बीराम तडवी आसेम टीम मा. पंचायत समिती सदस्य शेखर पाटील मुक्तार तडवी मा. मंडल अधिकारी तसेच पत्रकार मन्सूर तडवी परिवारातील मुलगा बिलाल तडवी पत्नी हमिदा तडवी बहिण रहिमत तडवी भाऊ करीम तडवी अब्दुल तडवी.मजीत आप्पा परसाडे साखळी येथील उपसरपंच वसीम खान ग्रामपंचायत सदस्य सरफराज तडवी सरदार तडवी मुसा पटेल(ठाकूर) सत्तार तडवी दहिगाव असंख्य तडवी समाजातील नातेवाईक उपस्थित होते