कोरोनाचा प्रकोप वाढतोय! दोन दिवसांत २१ मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णसंख्या ३,८८३ वर.

0


24 प्राईम न्यूज 2 Jun 2025

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88300/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1000/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारीपर्यंत सक्रिय रुग्णांची संख्या ३,८८३ वर पोहोचली असून, गेल्या ४८ तासांत २१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एक वेळेस अवश्य भेट देऊन खात्री करा

केरळमध्ये सर्वाधिक १,४०० सक्रिय रुग्ण आढळले असून, त्यानंतर महाराष्ट्रात ४८५ आणि दिल्लीत ४३६ रुग्ण आहेत. गेल्या ४८ तासांत देशभरात १,००० हून अधिक नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी २०२५ पासून आतापर्यंत कोरोनामुळे २८ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील २१ मृत्यू फक्त गेल्या दोन दिवसांत झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि केरळमध्ये प्रत्येकी ७ मृत्यू झाल्याची नोंद आहे.

महाराष्ट्रात शनिवारी कोविडचे ६८ नवीन रुग्ण आढळले. तर जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ७४९ रुग्ण सापडले आहेत. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि लसीकरणाची पूर्तता करणे गरजेचे असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!