अमळनेर: बोरी नदीतून अवैध वाळू वाहतूक जोरात; नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – अमळनेर तालुक्यातील बोरी नदीतून अवैध वाळू वाहतुकीचे सत्र जोरात सुरू असून, ही वाहतूक चक्क रात्रभर शाह आलम नगर मार्गे शह रात पहाटेपर्यंत सुरूच असते. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही वाहतूक काही “आशीर्वादाने” सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

रोजच्या या चोरट्या वाळू वाहतुकीमुळे परिसरातील लोकांना रात्री झोप घेणे कठीण झाले आहे. ट्रॅक्टरच्या आवाजामुळे विशेषतः लहान मुले घाबरून जागी होतात. रात्रीच्या वेळी अशा मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या आवाजाने नागरिकांचे मानसिक आरोग्यही बिघडू लागले आहे.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काही नागरिकांनी रात्री रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला असून, यामध्ये जर काही अनुचित प्रकार घडला तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असे नागरिकांचे म्हणे आहे.
“प्रशासनाच्या आशीर्वादानेच ही अवैध वाहतूक चालू आहे का?” असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमध्ये उपस्थित होऊ लागला आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रशासन, पोलिस आणि महसूल विभाग यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
वाहतूक थांबवावी आणि प्रशासनाने जागे व्हावे.अशी नागरिकांची मागणी आहे..