वक्फ कायद्याविरोधात महिलांची मानव साखळी; राष्ट्रपतींना अकरा मागण्यांचे निवेदन..

24 प्राईम न्यूज 3 Jun 2025
वक्फ अधिनियम २०२५ च्या विरोधात रविवारी (१ जून) दुपारी जळगाव शहरात हजारो महिलांनी वक्फ बचाव समितीच्या माध्यमातून ‘इन्सानी जंजीर’ अर्थात मानव साखळी उभी करून तीव्र निषेध नोंदवला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या आवाहनानुसार घेण्यात आलेल्या या आंदोलनातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्फत अकरा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **
निवेदनातील मुख्य मुद्दे –
वक्फ अधिनियम २०२५ हा भारतीय संविधानाच्या कलम १४, २५, २६ व २९ चा स्पष्ट उल्लंघन करत असल्याचा आरोप.

हा कायदा धार्मिक भेदभाव निर्माण करणारा असून, मुस्लिमांसाठी वेगळा कायदा व इतर धर्मीयांसाठी वेगळा कायदा म्हणजे जातीयवादाचे समर्थन असल्याचा विरोध.
मुस्लिम समाजाच्या संपत्तीबाबत कायद्यात दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप.
वक्फ/दान करण्यासाठी व्यक्तीने सलग पाच वर्षे इस्लाम धर्माचे पालन केले असावे, ही अट असंवैधानिक असल्याचे नमूद.
अनेक सरकारी जमिनी वक्फच्या ताब्यात असून त्या सरकारकडे परत नेण्याचा इशारा चुकीचा असल्याचे मत.
वक्फ बोर्डात दोन हिंदू सदस्यांचा समावेश ही बाबही संविधानविरोधी असल्याचा आरोप.
या कायद्याला संपूर्णतः रद्द करण्याची मागणी करत महिलांनी शांततेत आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.
शिष्टमंडळात या महिलांचा समावेश –
नाझिया एजाज, तंजिला इकबाल, सुफिया निसार, अलीना मुक्तार, रुबीना इकबाल, हुमेरा नासिर, सलमा सुलतान, खदीजा बागवान, सय्यद झवेरीया, सय्यद यास्मिन, शबीना सय्यद, शकीला बागवान, अंजुमन बी, शबाना परवेज आदी महिला उपस्थित होत्या.