आदिवासी क्रांती दल शाखा अमळनेर तर्फे बोदर्डे – मूडी येथील काशिनाथ भील यांना किराणा वस्तू देऊन मदत..

आबिद शेख/अमळनेर


काही दिवसापूर्वी अमळनेर तालुक्यातील मूडी बोदर्डे या गावात आदिवासी भील समाजातील काशिनाथ भील यांची झोपडी रात्री अचानक आग लागली होती,त्यात त्यांचा घरातील सर्व वस्तू, भांडे,खाण्या पिण्याच्या वस्तू, सर्वच जाळून खाक झाले होते,आणि आता या विषयाला 8 दिवस झाले, परंतु यांची विचारपूस करण्यासाठी या गावातील ना सरपंच आले, ना तालुक्यातील कोणी लोकप्रतिनिधी आले, ही गोष्ट आदिवासी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांना लक्षात आली, त्यावेळी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी मिळून संसारासाठी लागणाऱ्या खाण्या पिण्याच्या, किराणा सर्व वस्तू विकत घेऊन, थेट बोदर्डे गाव गाठले, व त्या परिवारास मदत केली, त्या परिवाराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते, ते पाहून मन भरून आले, याच्यापुढेही तालुक्यात कुठल्याही आदिवासी, मागासवर्गीयांवर आणि अत्याचार किंवा कोणी संकटात असेल तर आदिवासी क्रांती दल अमळनेर त्यांच्यापर्यंत निश्चितच प्रयत्न करेल,त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रविण बैसाणे, तालुकाध्यक्ष आप्पा दाभाडे, गोरख बाबा साळुंखे, संतोष संदानशिव,पत्रकार गणेश चव्हाण,प्रभाकर पारधी,गणेश पारधी,ईश्वर भील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.