गोसेवा आयोगाचे आदेश बेकायदेशीर, ते रद्द करावेत. – एकता संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी

24 प्राईम न्यूज 3 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

ईद-उल-अजहा (बकरी ईद)च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोसेवा आयोगाने 27 मे 2025 रोजी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एक आदेश जारी केला. या आदेशानुसार 3 ते 8 जून दरम्यान जिल्ह्यातील विविध गावांमध्ये गुरांचा बाजार भरू नये, जेणेकरून गोवंशाची कत्तल टाळता येईल, असा उद्देश नमूद केला आहे. मात्र, हा आदेश बेकायदेशीर असल्याचा आरोप एकता संघटनेने केला आहे.
गैरकायदेशीर आदेश रद्द करण्याची मागणी
याविरोधात एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. गोसेवा आयोगाकडे बाजार समित्यांना आदेश देण्याचा अधिकारच नाही, केवळ शिफारसी करण्याचा अधिकार आहे, असे समन्वयक फारुक शेख यांनी स्पष्ट केले. त्यांनी आयोगाच्या अधिकारांच्या अतिरेकावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
शेतकरी व मजुरांचे होणार नुकसान
फारुक शेख यांनी सांगितले की, गुरांचा बाजार बंद पाडल्याने शेळ्या, मेंढ्या व म्हशींच्या कायदेशीर व्यापारावर गदा येणार आहे. यामुळे शेतकरी, मजूर, वाहनचालक, दलाल आणि खाटीक समाजाचे मोठे आर्थिक नुकसान होईल. बकरी ईदच्या आधी या प्राण्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे या काळात बाजारपेठा बंद ठेवणे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी घातक ठरेल.
धार्मिक स्वातंत्र्यावर गदा – संविधान विरोधी कृत्य
एकता संघटनेने असा दावा केला आहे की, धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधात असा निर्णय घेतल्यास तो संविधानाच्या तरतुदींचा भंग करणारा ठरेल. सुप्रीम कोर्टानेही धार्मिक बळी प्रथा ही शतकानुशतकांपासून चालत आलेली असून ती थांबवता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री व इतर अधिकाऱ्यांना निवेदन सादर
एकता संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक, पोलीस अधीक्षक जळगाव, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव व मुख्यमंत्री सचिवालय कक्ष यांना आदेश रद्द करण्याची विनंती करणारे निवेदन दिले. हे निवेदन फारूक शेख, नदीम मलिक, युसुफ खान व सैयद चांद यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सादर केले.
शिष्टमंडळातील सदस्य
या शिष्टमंडळात फारुक शेख, सय्यद चांद, नदीम मलिक, अनिस शहा, युसुफ खान, अनवर सिकलगार, अतिक अहमद, मतीन पटेल, जावेद मुल्ला (जामनेर), सय्यद इमरान अली, नाजमोद्दीन शेख, इमरान शेख, युसुफ शाह, मुजाहिद खान, हाफिज शहीद, अख्तर शेख, वसीम शेख यांचा समावेश होता.