“शिस्तभंग केल्यास थेट व्हॉट्सअॅपवर नोटीस – सरकारी यंत्रणा झाली सज्ज!”

24 प्राईम न्यूज 3 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाच्या नोटीसीसंदर्भात नवा बदल करण्यात आला आहे. यापुढे या नोटीसा फक्त टपालानेच नाही, तर ई-मेल आणि व्हॉट्सअॅपवरही पाठवता येणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत सोमवारी अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
शिस्तभंगाच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना वेळेत उत्तर देण्याची संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत दोषारोप पत्र, चौकशी अहवाल यांसारखी कागदपत्रे कर्मचाऱ्यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर पाठवली जातील. तसेच, व्हॉट्सअॅपवरही ही माहिती शेअर केली जाणार आहे.
यापूर्वी ही कागदपत्रे नोंदणीकृत टपालाने किंवा प्रत्यक्ष देण्यात येत होती. मात्र, अनेक वेळा संबंधित व्यक्तींपर्यंत कागदपत्रे वेळेवर पोहोचत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळेच हा डिजिटल पर्याय आता वापरण्यात येणार आहे.
तथापि, जुनी पद्धत म्हणजेच प्रत्यक्ष देणे किंवा टपालाचा वापरही कायम राहणार आहे. त्यामुळे अधिक प्रभावी आणि वेगवान शिस्तभंग कारवाईची अंमलबजावणी शक्य होणार आहे.