पर्यावरण दिन विशेष आवाहन! . “प्लास्टिकला रामराम – कापडी पिशवीचं स्वागत”. -साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक उपक्रम.


आबिद शेख/ अमळनेर
साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानतर्फे सर्व कृतीशील सहकारी, पाठीराखे, हितचिंतक, तसेच अमळनेर शहरातील सर्व संवेदनशील नागरिकांना ५ जून – जागतिक पर्यावरण दिन या निमित्ताने खास आवाहन करण्यात येत आहे.

उपक्रमाचे वैशिष्ट्य:
५ जून रोजी सकाळी ११ वाजता, अमळनेर येथील भाजी बाजारात, जुन्या साड्यांपासून तयार केलेल्या कापडी पिशव्या भाजी विक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात भेट देण्यात येणार आहेत. यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर स्वयंशिस्तीतून बंद करण्याची सुरुवात केली जाईल.

आपले सहभाग महत्त्वाचा – चला पर्यावरण मित्र होऊ या!
👉 प्लास्टिक पिशव्यांना अलविदा करून कापडी पिशव्या पुन्हा सवयीचा भाग बनवूया
👉 दुध, मटन, हॉटेल पार्सल, भाजीपाला – सर्व ठिकाणी डबा किंवा कापडी पिशवी वापरण्याचा संकल्प करूया
👉 आपल्याच पुढील पिढीच्या भविष्याचा विचार करून आजपासूनच कृतीशील पावले उचलूया
संपर्क करा आणि पर्यावरण मित्र बना:
📞 8999214021 / 9075570510
हा उपक्रम म्हणजे केवळ एक दिवसापुरता कार्यक्रम नसून, संपूर्ण वर्षभर पर्यावरण जागृतीचे अभियान असेल.
आपली कृती, आपली जागरूकता – हेच परिवर्तनाचे खरे साधन!
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **