प्रताप महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – प्रताप महाविद्यालयात आज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरल्या संख्याशास्त्र विभागातील तीन विद्यार्थिनी, ज्यांनी राष्ट्रीय स्तरावरील IIT-JAM परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले. कु. अश्विनी अशोक भदाणे हिने AIR-130 क्रमांक पटकावून IIT पवई येथे M.Sc Statistics साठी निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे तिने GATE परीक्षेतही AIR-228 मिळवून दुहेरी यश संपादन केले आहे. अश्विनी ही मंगरूळ येथील स्व. अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे.

याच विभागातील कु. लीना दिलीप शिरसाट हिला AIR-398 मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. ती प्रताप महाविद्यालयातील कर्मचारी श्री. दिलीप शिरसाट यांची कन्या आहे. तर विद्यार्थी दुर्गेश पाटील याने देखील IIT-JAM परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.
तसेच JEE-Advance 2025 परीक्षेत OBC प्रवर्गात AIR-4050 क्रमांक मिळवणाऱ्या वेदांत विजय मांटे याचाही विशेष गौरव करण्यात आला. तो महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय मांटे यांचा पुत्र आहे.
या कार्यक्रमात 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील मुलाखत स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या निर्भय धनंजय सोनार याचाही सत्कार करण्यात आला. दि. 2 ते 4 फेब्रुवारी 2024 दरम्यान झालेल्या संमेलनात त्याने पत्रकारितेतील उत्कृष्ट कौशल्य दाखवत उल्लेखनीय कामगिरी केली.
या गौरव सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष श्री. निरज अग्रवाल, संचालक डॉ. अनिल शिंदे, श्री. प्रदीप अग्रवाल, संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पाटील, प्राचार्य डॉ. ए. बी. जैन, उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय मांटे, प्रा. जे. बी. जैन, प्रा. सुनील पाटील, प्रा. उमेश येवले, श्री. जे. पी. पाटील, अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97200/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72900/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1005/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **