आयएमएच्या मेडिकोलीगल राज्य कमिटीवर अमळनेरच्या डॉ.हिरा बाविस्कर यांची नियुक्ती….

अमळनेरला प्रथमच मिळाला बहुमान
अमळनेर (प्रतिनिधि)संपुर्ण भारतात कार्यरत असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या महाराष्ट्र राज्य मेडिकोलीगल (न्याय वैद्यक)कमिटीवर अमळनेर येथील एम डी पॅथॉलॉजिस्ट डॉ.हिरा शरद बाविस्कर यांची मेंबर पदी नियुक्ती झाली असून त्यांच्या रूपाने प्रथमच अमळनेर तालुक्यास हा बहुमान मिळून थेट राज्य कमिटीवर काम करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
संपूर्ण भारतातील एमबीबीएस व त्यापेक्षा उच्च पदवी प्राप्त असणाऱ्या डॉक्टरांची आय एम ए ही संघटना असून ही संघटना डॉक्टरांच्या हितासह भारत सरकारला वेळोवेळी गाईडलाईन देणे,आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करणे, आणि जीथे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असतील तेथे सरकारला मदत करणे आदी कार्य करीत असते,कोरोना काळात देखील फ्रंटलाईन वर या संघटनेचे कार्य होते.याच आयएमए संघटनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य स्तरावर स्वतंत्र मेडिकोलीगल कमिटी असून यात राज्य भरातील 13 तज्ञ डॉक्टरांचा समावेश होत असतो.नुकतीच ही कमिटी आयएमए महाराष्ट्र स्टेट यांनी जाहीर केली असून यात अमळनेर येथील डॉ.हिरा शरद बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.डॉ हिरा बाविस्कर यांनी एमबीबीएस, एम डी पॅथ.नंतर काही दिवसांपूर्वीच एल एल बी पदवी देखील गेल्या वर्षी प्राप्त केली आहे.त्याच मुळे त्यांना थेट या राज्य कमीटीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे.स्टेट सेक्रेटरी डॉ.संतोष कदम यांच्याकडून नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.
डॉ.हिरा बाविस्कर या अमळनेर येथील शिवम पॅथॉलॉजी च्या संचालिका असून कस्तुरबा रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ डॉ.शरद बाविस्कर यांच्या त्या पत्नी आहेत.त्यांची थेट मेडिकोलीगल राज्य कमिटीत नियुक्ती झाल्याने त्यांचे अमळनेर आयएमए अध्यक्ष डॉ अविनाश जोशी,सेक्रेटरी डॉ संदीप जोशी,सहसेक्रेटरी डॉ प्रशांत शिंदे, तसेच डॉ बी एस पाटील, डॉ अनिल शिंदे,डॉ रवींद्र कुळकर्णी, डॉ मंजिरी कुळकर्णी, डॉ ओस्तवाल,डॉ अनिल हजारे,डॉ निखिल बहुगुणे,डॉ नितीन पाटील,डॉ सचिन हजारे,डॉ किरण बडगुजर, डॉ राहुल मुठे,डॉ प्रकाश ताडे,डॉ जि एम पाटील,डॉ विनोद पाटील,डॉ प्रसन्न जोशी,डॉ विक्रांत पाटील,डॉ भूषण पाटील,डॉ दिनेश पाटील,डॉ सुमित सुर्यवंशी,डॉ स्वप्ना पाटील,डॉ मनीषा भावे,डॉ मयुरी जोशी,डॉ सौ प्राजक्ता बहुगुणे,डॉ दीपक धनगर,डॉ मनीषा पाटील,डॉ सौ उर्वी जोशी,डॉ सौ प्रियंका पाटील यासह अमळनेर व संपुर्ण जळगाव जिल्हा आणि खान्देश परिसरातील डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.