वडजाई दर्गा येथील काँक्रीट रस्त्याचा आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ…

धुळे (अनिस अहेमद) धुळे शहर मतदार संघात विकास कामांची जोरदार सुरुवात करीत असतांना हद्दवाढ गावांचा प्रश्न अनुत्तरीत राहू नये या भूमिकेतून आ.फारुख शाह यांनी हद्दवाढीने महापालिकेत समाविष्ठ झालेल्या गावांसाठी स्वतंत्रपणे ग्रामविकास विभागाकडून देखील निधी खेचून आणला आहे. त्यासंदर्भात ग्रामविकास विभागाकडील निधीतून वडजाई दर्गाने व
डजाई रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम प्रस्तावित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या ३८,३५,४६१ खर्चाच्या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे,कनिष्ठ अभियंता सलीम शाह नगरसेवक नासिर पठाण, मूक्तार अन्सारी ,नगरसेवक गनी डॉलर,नगरसेवक सईद बेग,डॉ.दीपष्री नाईक,डॉ.पवार, प्यारेलाल पिंजारी,मौलवी शकील,रियाज अली सर,आमिर पठाण ,साजिद साई,साबीर सैय्यद,निजाम सय्यद,इकबाल शाह,आसिफ शाह,जमील खाटीक,युसुफपापा सर,वसिम अक्रम, हालिम शमसुद्दिन,नाजिम शेख,रिजवान अन्सारी,, माजीद पठाण,मुस्ताक पहिलवान , साकिव शाह, फरिदा अन्सारी, रईस शेख,साजिद बाबा,नासिर बागवान,सलीम शेख,जावेद मेमन,लुकमान शेख आदी उपस्थित होते.
