प्रताप मिल कॉलनीतून वाहतूक वळविल्याचा फटका. -जड वाहनांनी जलवाहिनी तोडली; १५ दिवसांपासून नागरिक पाण्याविना.

आबिड शेख/ अमळनेर

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1025/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर – शहरातील भद्रा चौकातून हायवेवरील वळण रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक प्रताप मिल कॉलनीमार्गे वळवण्यात आली. मात्र या मार्गावरून सतत ये-जा करणाऱ्या जड वाहनांमुळे कॉलनीतील भूमिगत जलवाहिनी तुटली आहे. परिणामी, गेल्या १५ दिवसांपासून स्थानिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भोगावा लागत आहे.

बेटावदकडे जाणाऱ्या गलवाडे रोडवरील वळणावर मोठा खड्डा पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. काँग्रेसने यावर अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवत खड्ड्यात वृक्षारोपण करून आंदोलन छेडले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या खड्ड्याची डागडुजी करण्याचे काम हाती घेतले असले तरी २० दिवसांपासून हे काम रखडलेलेच आहे. “होईल, होईल” असे सांगत ३ आठवडे उलटले तरी प्रत्यक्षात काहीच काम झालेले नाही.
प्रत्येक क्षणी धोकादायक ठरणाऱ्या या रस्त्यावरून होणारी अहोरात्र जड वाहनांची वाहतूक ही प्रताप मिल कॉलनीतील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. या भागातील लोकांना ना नीट रस्ता मिळतोय, ना पिण्याचे पाणी. न.पा. प्रशासनही जलवाहिनीची दुरुस्ती करण्यास पुढे येत नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे.
गोकुळधामजवळ देखील मोठा खड्डा पडला असून, रस्ता धसल्याने अनेक वाहने तिथे अडकून पडत आहेत. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
“उंटावर बसून शेळ्या हाकण्यात काही अर्थ नाही, जमिनीवर उतरून जनतेच्या समस्या समजून घ्याव्यात” अशी संतप्त प्रतिक्रिया आता अमळनेरकर देत आहेत.
