भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी नवे धोरण! -ACB च्या प्रस्तावांवर ३ महिन्यांत निर्णय बंधनकारक..


24 प्राईम न्यूज 6 Jun 2025
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात नोंदवण्यात आलेल्या प्रकरणांवर सरकारकडून वेळेवर कारवाई होत नसल्याबद्दल टीका होत असताना, राज्य सरकारने अखेर पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सामान्य प्रशासन विभागाने (GAD) यासंदर्भात ८ पानी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

या नव्या धोरणांतर्गत ACB कडून पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांविरोधात खटला भरण्याच्या प्रस्तावांसाठी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आतापर्यंत गृह विभागामार्फत प्रस्ताव पुढे पाठवले जात होते, मात्र आता ACB थेट संबंधित विभागांकडे प्रस्ताव पाठवणार आहे.

प्रत्येक विभागाने ACB च्या प्रस्तावांवर तीन महिन्यांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक करण्यात आले आहे — तो निर्णय सकारात्मक असो वा नकारात्मक. जर विभागाने प्रस्ताव नाकारला, तर तो स्पष्ट कारणांसह मुख्य सचिवांकडे सादर करावा लागणार आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, खटला भरण्याची परवानगी देणारे आदेश इतके स्पष्ट असावेत की, ते न्यायालयात फेटाळले जाणार नाहीत.
विशेष बाब म्हणजे, अद्यापही काही विभागांनी पात्र ठरलेल्या १७८ अधिकाऱ्यांना निलंबित केलेले नाही. यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभाग ४३ प्रकरणांसह आघाडीवर आहे, त्यानंतर नगरविकास विभागात ३४, पोलीस, कारागृह व गृह रक्षक दलात २४, तर महसूल विभागात २१ अधिकाऱ्यांचे प्रकरणे प्रलंबित आहेत.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाईला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 97900/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 73400/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1025/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **