ठाकरे गटात संघटनात्मक बदल: ४ नवीन उपनेत्यांची नियुक्ती.

24 प्राईम न्यूज 6 Jun 2025

– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आगामी महत्त्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटना बांधणीसाठी मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार, पक्षाने ४ नव्या उपनेत्यांची नियुक्ती केली आहे.

नवीन उपनेते हे पुढीलप्रमाणे:दत्ता गायकवाड (नाशिक) गुलाबराव वाघ (जळगाव) सुरेंद्र उर्फ बाळ माने (रत्नागिरी) – माजी आमदार सचिन घायाळ (जालना)

विशेष म्हणजे, गुलाबराव वाघ यांना उपनेतेपदासोबतच रावेर लोकसभा मतदारसंघ आणि नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यात दिवाळीच्या सुमारास महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता असल्याने, उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यावर भर दिला आहे.
