बकरी ईदच्या पूर्वसंध्येला मनियार बिरादरी कडून रेशन किटचे वाटप..

24 प्राईम न्यूज 7 Jun 2025

अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 88200/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1040/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

बकरी ईदच्या पूर्वसंध्येला, जळगाव जिल्ह्यातील मणियार बिरादरीने समाजातील गरीब बंधू-भगिनींना ईद चांगल्या प्रकारे साजरी करता यावी म्हणून, शहरातील काही लोकांनी शिफारशी केलेले गरजवंत यांना बिरादरी च्या कार्यालयात बोलावून रेशन किटचे वाटप केले.

रेशन किटमध्ये तेल, तूरडाळ, साखर, पोहे, शेंगदाणे, तिखट, धणे पावडर, मूगडाळ, बेसन, मठ डाळ, उडीद डाळ यांचा समावेश आहे. ज्याची किंमत ११००/- रुपये होती. एकूण ४५ किटचे वाटप करण्यात आल्याचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सांगितले.
रेशन किट घेण्यासाठी बोलावलेल्या लोकांचे रिक्षा भाडेही बिरादरीने दिले आहे.