“आधी केले, योगदान दिले – ‘सिंदूर’च्या यशस्वी प्रयोगाची राजवड गाथा!”

आबिद शेख/अमळनेर

राजवड (आदर्शगाव)कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या “राज फार्म” वर 15 ऑगस्ट 2023 रोजी केलेल्या “सिंदूर” लागवडीचा प्रयोग अल्पावधीतच यशस्वी ठरला आहे. नेहमीपेक्षा लवकर, अवघ्या 15 महिन्यांत 35 किलो नैसर्गिक सिंदूर उत्पादन घेण्यात आले आहे, जे कृषीशास्त्राच्या दृष्टीने एक उल्लेखनीय यश मानले जात आहे.

सामान्यतः सिंदूराचे उत्पादन लागवडीनंतर तीन वर्षांनी हाती येते. मात्र योजनाबद्ध व प्रयोगशील शेतीतून यांनी फक्त 15 महिन्यांत प्रती झाड 1 किलोप्रमाणे 35 झाडांमधून सिंदूरचे उत्पादन घेतले आहे.

सिंदूर झाडाचे वैशिष्ट्य: या झाडांना लालसर रंगाची फळे येतात, ज्यातून बिया मिळतात. या बियांमध्ये नैसर्गिक लालसर रंग असतो. बिया सावलीत सुकवून दळल्यानंतर तयार होणाऱ्या पावडरला नैसर्गिक कुंकू म्हणून ओळखले जाते.
सिंदूरचा उपयोग:
मांग भरण्याकरिता – हिंदू संस्कृतीतील सौभाग्याचे प्रतीक
नैसर्गिक खाद्य रंग – अन्नपदार्थांमध्ये वापर
सौंदर्य प्रसाधने व औषधांमध्ये – त्वचेसाठी सुरक्षित
धार्मिक विधींसाठी – रासायनिक कुंकूपेक्षा अधिक शुद्ध व सुरक्षित
हा प्रयोग केवळ कृषी यश नव्हे, तर नैसर्गिक पर्यायांना प्रोत्साहन देणारा एक प्रेरणादायी मार्ग आहे. कृषिभूषण साहेबराव पाटील यांचा हा उपक्रम इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.