रोटरी क्लब अमळनेर आयोजित RYLA कार्यशाळेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर – रोटरी क्लब अमळनेर यांच्या वतीने ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS (RYLA) अंतर्गत “व्यक्तिमत्व विकास व जीवन शिक्षण” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा रविवार, 8 जून रोजी रोटरी हॉल येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेत नाशिक येथील ख्यातनाम प्रा. ललित खैरनार यांनी मार्गदर्शन केले. अमळनेर येथील इयत्ता 10वीतील 135 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. व्यक्तिमत्व विकास आणि जीवन कौशल्ये या विषयांवर सहभागात्मक पद्धतीने आणि बौद्धिक खेळांच्या माध्यमातून मुलांनी मौल्यवान धडे घेतले. “कुछ पाने के लिए, कुछ ज्यादा करना पड़ता है” यासारखे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजवले गेले.
या विशेष कार्यशाळेतील प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला एक खास भेट देण्यात आली — रोटरी क्लब अमळनेर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 यांच्या संयुक्त प्रकल्पांतर्गत IDEAL STUDY, मुंबई यांनी तयार केलेले 10वी अभ्यासक्रमावर आधारित STUDY BUDDY मोबाईल अॅप, ज्याची बाजारमूल्ये ₹1500/- आहे, ते केवळ ₹15/- मध्ये उपलब्ध करून देण्यात आले.
या उपक्रमाचे उद्घाटन श्री. प्रदीप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे रो. मितेश गोसल्या आणि रो. लालचंद सैनानी यांनी जीवन शिक्षणाचे महत्त्व त्यांच्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. सूत्रसंचालन रो. प्रतीक जैन आणि रो. कीर्तीकुमार कोठारी यांनी केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करत रोटरी क्लब अमळनेरचे आभार मानले. अध्यक्ष रो. ताहा बुकवाला यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी रोटरीचे रो. विशाल शर्मा (सेक्रेटरी), रो. रोहित सिंघवी व रो. अविनाश अमृतकर यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.
रोटरी क्लब अमळनेर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने अशा कार्यशाळांचे आयोजन करत असून, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी RYLA हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.