मृत तरुणांच्या कुटुंबियांना मणियार बिरादरीकडून तात्काळ मदत – प्रत्येकी ११ हजारांची आर्थिक सहाय्यता..


24 प्राईम न्यूज 10 Jun 2025
जळगाव शहरातील दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. या दुःखद प्रसंगी जळगाव जिल्हा मणियार बिरादरी, एकता संघटना, आणि वक्फ बचाव समिती यांच्या वतीने दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी ११,००० रुपये आर्थिक मदत करण्यात आली.

दुर्घटनेत दोन तरुणांचा मृत्यू
मुबारक इस्माईल पिंजारी (वय २३), असोदा येथील रहिवासी, यांचे ६ जून रोजी घरात विजेचा धक्का बसल्यामुळे निधन झाले.
तर नदीम शेख अनीस (वय २४), तांबापूर, जळगाव येथील, यांचा मेहरूण तलावात बुडून मृत्यू झाला.
या दोन्ही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अतिशय सामान्य असून, ही घटना कुटुंबीयांसाठी अत्यंत धक्कादायक आहे.
मणियार बिरादरीकडून तत्काळ मदत
या पार्श्वभूमीवर, मणियार बिरादरीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दोन्ही कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रत्येकी ११ हजार रुपयांची मदत सुपूर्त केली. यावेळी त्यांना भावनिक आधारही देण्यात आला आणि भावी काळातही मदतीचे आश्वासन देण्यात आले.
फारूक शेख यांचे आवाहन
मणियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी या उपक्रमाबाबत माहिती देताना सांगितले की,
“या लहानशा प्रयत्नामुळे कुटुंबांना थोडा दिलासा मिळेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही दोन्ही तरुणांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबांच्या दुःखात सहभागी आहोत.”
ते पुढे म्हणाले की,
“अशा कोणत्याही आपत्तीकाळात मदतीसाठी आमच्याशी संपर्क साधावा. इंशा अल्लाह, आम्ही नक्कीच मदतीसाठी धावून जाऊ.”
कुटुंबांच्या दुःखात सहभागी झालेले सदस्य
या मदत कार्यात खालील मान्यवर सहभागी झाले होते:
मुफ्ती खालिद, मुफ्ती रमीज, फारूक शेख, अनीस शाह, हाफिज रहीम पटेल, आरिफ देशमुख, नदीम मलिक, मौलाना कासिम, सय्यद चांद, मौलाना उमर, मौलाना तौफिक शाह, मतीन पटेल, रज्जाक पटेल, अन्वर शिकलगर, मजहर पठाण, सलीम इनामदार, शाहीर तेली, इकबाल वजीर, ताहेर शेख, रौफ टेलर, युसूफ पठाण, अमजद पठाण, नजमुद्दीन शेख, अल्ताफ शेख, हरिस सय्यद, मुजाहिद खान, इम्रान शेख, सईद शेख आदी.
देणगीदारांचे मन:पूर्वक आभार
फारूक शेख यांनी सर्व देणगीदारांचे आणि समर्थकांचे विशेष आभार मानले.
“आपत्ती, वैद्यकीय गरज, स्वयंरोजगार, शिक्षण अशा विविध कारणांसाठी मदत करणाऱ्या सर्व बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवून रक्कम दिली, त्यासाठी आम्ही मन:पूर्वक कृतज्ञ आहोत.”
रवि ज्वेलर्स
अमळनेर.24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-
भाव प्रती 10 ग्राम