मुंबई लोकलमधून पुन्हा मृत्यूचे तांडव: दिवा-मुंब्रा दरम्यान ४ प्रवाशांचा मृत्यू, ९ जखमी..

24 प्राईम न्यूज 10 Jun 2025

मुंबई : मुंबईकरांची ‘लाईफलाइन’ म्हणून ओळखली जाणारी उपनगरी लोकल सेवा आता जीवघेणी ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला.

दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या एकमेकांच्या जवळून जात असताना दरवाजावर लटकणारे प्रवासी एकमेकांवर आदळले. त्यामुळे तब्बल १३ प्रवासी लोकलमधून खाली पडले. या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर कळवा आणि ठाणे येथील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
ही घटना सकाळी ७.२२ वाजता कसारा स्थानकाहून सीएसएमटीकडे निघालेल्या लोकलच्या वेळी घडली. नऊच्या सुमारास ही लोकल दिवा स्थानकाच्या जवळ येत असताना गाडीत प्रचंड गर्दी होती. दरवाजांवर लटकून प्रवास करणारे प्रवासी मुंब्रा-दिवा दरम्यानच्या वळणावर गाडीच्या वेगामुळे एकमेकांवर आदळले आणि काही प्रवासी खाली पडले, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रेल्वे प्रशासनाकडून या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू करण्यात आली असून प्रवासी सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीरपणे विचार होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-
भाव प्रती 10 ग्राम