“एकत्रीकरणाच्या चर्चांना झटका? अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणे टाळले”


24 प्राईम न्यूज 10 Jun 2025
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या एका हालचालीमुळे पुन्हा चर्चांना वेग आला आहे. सोमवारी पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवार यांच्या शेजारी बसणे टाळल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा सस्पेन्स निर्माण झाला आहे.

कार्यक्रमात आयोजकांनी केलेल्या बैठक व्यवस्थेत स्वतःहून बदल करत, अजित पवारांनी वेगळी जागा निवडली. शरद पवार यांच्याशी जवळीक वाढल्याचे अलीकडील घटनांतून दिसत असतानाच, हा निर्णय त्यांच्या मनातील संभ्रम वा सावधगिरीचे लक्षण असल्याचे बोलले जात आहे.
विशेष म्हणजे आज, मंगळवार (१० जून) रोजी, पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे स्वतंत्र वर्धापनदिन कार्यक्रम होत आहेत. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये, म्हणूनच अजित पवारांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षभरात अजित पवारांनी शरद पवारांसोबत मंच शेअर करणे टाळले होते. परंतु सत्ताधारी युतीत राष्ट्रवादी (अजित गट) ची मर्यादित भूमिका लक्षात घेता, एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगत होती. मात्र, कालच्या घटनेमुळे काका-पुतण्यांमधील ‘राजकीय दुरावा’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 96000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 87900/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 72000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1050/-
भाव प्रती 10 ग्राम