पर्ल इंटरनॅशनल स्कूलचे
स्नेहसंमेलन-चिमुकल्यांनी
गाजवले..

अमळनेर (प्रतिनिधि)पर्ल इंटरनॅशनल स्कूल,अमळनेर
तर्फे 17 फेब्रुवारी 2023 रोजी
स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा
कार्यक्रम प्रमुख पाहुणे भाऊसाहेब
देशमुख(निवृत्त प्रशासनाधिकारी
नगरपालिका अमळनेर)व कार्यक्रमाचे
अध्यक्ष श्यामकांत भदाणे(माजी
व्हाईस चेअरमन

ग.स.सोसायटी
जिल्हा जळगाव)तसेच संस्थेचे
चेअरमन चंद्रकांत भदाणे सर,संस्थेचे
संचालक भैय्यासाहेब मगर सर,यांच्या
हस्ते द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची
सुरुवात करण्यात आली.
स्नेहसंमेलनाची सुरूवात देवा श्री
गणेशा या गाण्यापासून करण्यात
आली,गलती से मिस्टेक,श्री वल्ली,
मेरे पापा,मैने पायल है छनकाई,प्रेम
रतन,असे विविध प्रकारच्या गाण्यांवर
सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.
तसेच ITI च्या विद्यार्थ्यांनी
अंधश्रध्देवर(अंगात आलाय देव)
हे नाटक सादर करुन सर्व विद्यार्थ्यांचे
व पालकांचे मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.प्रज्ञा
पाटील मॅडम यांनी केले तसेच
कार्यक्रम प्रास्ताविक प्राचार्या जयश्री
चौधरी मॅडम यांनी,तर आभार विजय
धनगर सर व जयश्री पाटील मॅडम
यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ITI
चे प्राचार्य प्रकाश पाटील सर,प्रमोद
पाटील सर,सचिन माळी सर,विजय
चौधरी सर,सखाराम पावरा यांनी
प्रयत्न केले.