कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज जयंती निमित्त आ.फारुख शाह यांनी केले अभिवादन..

धुळे (अनिस अहेमद) कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे.रयतेचा राजा छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आ.फारुख शाह यांनी समस्त शिवप्रेमी जनतेला शुभेच्छा दिल्या.
एका बाजूला देशात सामान्य जनता महागाईने होरपळत आहे,बेरोजगारीने कळस गाठलेला आहे तर दुसऱ्या बाजुला सत्ताधारी जनतेच्या प्रश्नांना बगल देवून धार्मिक उन्माद पसरविण्यात मश्गूल आहेत.अशा काळात छ.शिवरायांचे रयतेच हित जोपासण्याच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित होते.आज शिवबा असते तर त्यांनी जनताद्रोही सत्ताधाऱ्यांचा रायगडावरून कडेलोट केला असता.त्यामुळे आजच्या काळात कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज यांचे विचार,त्यांचा राजकीय व्यवहार,अर्थानिती,शेती धोरण याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन आ.फारुख शाह यांनी केले आहे.