नॅशनल हायस्कूल, चाळीसगावमध्ये प्रवेशोत्सव साजरा; ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत..

24 प्राईम न्यूज 17 Jun 2025
चाळीसगाव नॅशनल हायस्कूल, चाळीसगाव येथे आज नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. या विशेष दिवशी शाळेत भव्य प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ढोल आणि मिरवणुकीसह प्रभातफेरी काढण्यात आली, ज्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावाने करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांना नव्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. नव्या वर्षात यशस्वी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना (दुआ) करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक सलीम खान सर, उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान सर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी उत्तम रितीने पार पाडली गेली.
विद्यालय प्रशासनाने विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिक्षणासाठी प्रेरणा दिली आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या.