अमळनेर येथे संत निरंकारी मिशनतर्फे 60 रक्त युनिट संकलन; समाजहिताच्या कार्यात मंडळाचा सहभाग..

0

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर– युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांच्या प्रेरणेतून संत निरंकारी मिशनतर्फे सुरू झालेल्या रक्तदान अभियानाचा एक भाग म्हणून अमळनेर येथे एक भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.

दि. 15 जून रोजी, चोपडा रोडवरील संत निरंकारी सत्संग भवन, सिंधी कॉलनी अमळनेर येथे सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत भरवण्यात आलेल्या या शिबिरात एकूण 60 रक्त युनिट्स संकलित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन झोनल इंचार्ज श्री. हिरालाल पाटील (धुळे झोन 36-B) यांच्या हस्ते झाले. यावेळी अमळनेर परिसरातील व ग्रामीण भागातील साध संगत मोठ्या संख्येने उपस्थित होती.

शिबिराच्या पूर्वसंध्येला, 14 जून रोजी एक विशाल मोटरसायकल रॅली काढण्यात आली, ज्याद्वारे जनजागृती करण्यात आली.

या शिबिरात जळगाव येथील रेडक्रॉस रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचारीवर्गाने रक्त संकलनाची जबाबदारी पार पाडली. रक्तदात्यांसाठी चहा-पाणी, फळफळावळ, अल्पोपहार, जेवणाची व्यवस्था तसेच प्रशस्तीपत्र दिले गेले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमळनेर ब्रँचचे मुखी श्रीचंद दादा निरंकारी आणि सेवादल इंचार्ज श्री. जितेंद्र डिंगराई यांच्या नेतृत्वात सर्व सेवादल सदस्य, साध संगत, महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी संत निरंकारी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत त्याच्या सामाजिक उपक्रमांत – रक्तदान, स्वच्छता मोहीम, “स्वच्छ जल स्वच्छ मन”, वृक्षारोपण, नेत्रतपासणी – यामधील सहभागाचे विशेष उल्लेख केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!