चाळीसगाव नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा.

24 प्राईम न्यूज 21 Jun 2025

चाळीसगाव येथील नॅशनल हायस्कूल व ज्यु. कॉलेज, चाळीसगाव येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ‘योग संगम’ हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता झाली. क्रीडा शिक्षक मोहीसन सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करवून घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी अत्यंत आनंदाने सहभाग घेत योगाचे शारीरिक व मानसिक फायद्यांविषयी सखोल माहिती घेतली.
या प्रसंगी शाळेचे व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. योगासने, प्राणायाम व ध्यान यांचा अनुभव घेत सर्व सहभागींचा उत्साह दुणावला. कार्यक्रमाचा समारोप सकाळी ९.०० वाजता झाला.
संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि आरोग्यप्रद ठरला. विद्यार्थ्यांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश या माध्यमातून यशस्वीरीत्या साध्य झाला.