शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेरमध्ये सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद; -पहिल्याच दिवशी २०१ नविन सभासद

आबिद शेख/अमळनेर

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त अमळनेर येथे आयोजित सभासद नोंदणी अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या अभियानात पहिल्याच दिवशी तब्बल २०१ नवीन सभासदांची नोंदणी झाली असून, ही संख्या शिवसैनिकांच्या संघटनेतील बळ आणि जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार अमोल चिमणराव पाटील आणि जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील आणि शहर प्रमुख संजय कौतिक पाटील यांच्या हस्ते सभासद नोंदणीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा आणि जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.
सभासद नोंदणी ही निवडणुकीप्रमाणेच महत्वाची असल्याने, घराघरात जाऊन जनतेशी संपर्क साधण्याचे आवाहन सुरेश पाटील यांनी केले.
कार्यक्रमात रविंद्र भाऊराव पाटील (हेडावे), माजी सरपंच अनील पाटील (रढावन), अमित ललवाणी (अमळनेर), संतोष महाजन, शिवदास पाटील, भूषण कोळी (हिंगीणे खु.), रितेश बोरसे, शोएब शेख, प्रकाश पाटील, रामकृष्ण पाटील, मानसिंग सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि युवक सहभागी झाले होते.