जागतिक योग दिनानिमित्त योगाविषयी जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम!

आबिद शेख/अमळनेर

आज २१ जून रोजी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी पाच वाजता नाट्यगृहाच्या प्रांगणात दैनंदिन योग साधनेत गुंतलेले स्थानिक साधक आणि इतर केंद्रातील साधक एकत्र जमून योगाविषयी जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात सकाळी सात वाजता साने गुरुजी प्राथमिक विद्यालय, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय आणि साने गुरुजी कन्या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक बांधवांनी सहभाग घेतला. योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावरील फायदे समजून घेत त्याचा आपल्या व्यक्तिमत्वाशी असलेला संबंध जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमात करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी मनोभावे सहभाग दर्शवत शरीर आणि मनाच्या एकात्मतेसाठी सजगता दाखवली. या प्रसंगी पतंजली ऋषी आणि त्यांच्या शिष्यगणांचे स्मरण करून त्यांचे आभार मानण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी एक सकारात्मक संदेश देण्यात आला —
“निरोगी रहा, स्वस्थ रहा, चांगले खा, चांगले विचार आत्मसात करा, आणि समाजाशी चांगले संबंध प्रस्थापित करत सर्वांचे जीवन सुखी व समाधानी करा.”