“बाल कुमार गप्पा-टप्पा” : बाल कलाकारांसोबत संवादाची अनोखी संधी.

आबिद शेख/अमळनेर

अमळनेरमध्ये मुलं व पालकांसाठी एक विशेष कार्यक्रम — “बाल कुमार गप्पा-टप्पा” — आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता, साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रोड, अमळनेर येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.
या कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरणार आहे श्यामची आई या सुजय डहाके दिग्दर्शित चित्रपटातील बालकलाकार शर्व गाडगीळ याची मुलाखत. या मुलाखतीत परिसरातील ११ बाल कुमार सहभागी होणार असून, ते आपल्या प्रश्नांद्वारे थेट संवाद साधणार आहेत.
हा कार्यक्रम मुलांमध्ये कलात्मक अभिव्यक्ती, विचारमंथन आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरणार आहे. पालकांसाठीही हा एक सृजनशील अनुभव ठरणार आहे.