बाल पत्रकारांची कलाकाराशी गप्पा! अमळनेरमध्ये ‘श्याम’ची खास मुलाखत..

आबिद शेख/अमळनेर
साने गुरुजींच्या 75 व्या स्मृतीदिनानिमित्त साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, अमळनेर येथे एक अनोखा आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पार पडला. ‘बाल कुमार गप्पा टप्पा’ या विशेष कार्यक्रमात, ‘श्यामची आई’ या सिनेमात श्याम म्हणजेच साने गुरुजींची भूमिका साकारलेला कलाकार शर्व गाडगीळ (पुणे) याची समूह मुलाखत घेण्याची संधी तब्बल 11 बाल पत्रकारांना मिळाली.

रविवार, दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता साने गुरुजी कर्मभूमी स्मारक, गलवाडे रोड, अमळनेर येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
बाल पत्रकार म्हणून सहभाग घेतलेल्या मुलांचे नावे खालीलप्रमाणे:अद्विक भुषण सोनवणे,शिव रणजित शिंदे,मानवी सुनील पाटील,मुक्ता गौरव महाले,मानसी रमाकांत सैंदाणे,दक्षता उमेश काटे,कल्याणी संदीप पाटील,गार्गी सुनील जोशी,वेदांत रविंद्र देवरे,मानसी अनुराधा किशोर,
या मुलांनी “तुला जेवायला काय आवडतं?”, “तुला आई रागावते का?”, “तू कोणते खेळ खेळतोस?”, “तू शिक्षक होशील का?” अशा खुसखुशीत प्रश्नांपासून ते साने गुरुजींच्या जीवनावर आधारित गंभीर प्रश्नांपर्यंत विविध गोष्टींबाबत विचारणा केली. पालकांनीही या मुलाखतीत प्रश्न विचारून सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाला ‘साने गुरुजी जीवनगाथा’ परीक्षेत परीक्षण लिहलेले नारायण पवार यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच चोपडा येथील स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थी आणि डॉ. विकास हरताळकर यांचाही सहभाग होता.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गौरव महाले, संजय बारी, शुभम पवार, प्रथमेश कोठावदे, प्रणव पाटील, आश्विनी वाघमोडे, शिव निकम, अभय वाघमोडे, खुशाल भामरे, देवेंद्र पाटील, मंदाकिनी पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
सुत्रसंचालन दर्शना पवार यांनी तर पाहुण्यांचे स्वागत मिलिंद वैद्य, चेतन सोनार आणि गोपाळ नेवे यांनी केले. विशेष म्हणजे, श्यामची भूमिका साकारणाऱ्या शर्व गाडगीळ यांची आई ऋचा मुळे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
कार्यक्रमानंतर पर्यावरणपूरक स्मारक परिसरात सर्वांनी स्वादिष्ट कचोरी, समोसे आणि केळी यांचा आस्वाद घेतला.
अमळनेर परिसरातील पालक, शिक्षक आणि मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.