योगा दिनानिमित्त अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये योगसाधना..

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे औचित्य साधून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २१ रोजी सकाळी ७ वाजता योगासने करण्यात आली. योग शिक्षिका प्रतिभा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्साहात सहभागी होत योगाभ्यास केला.
या योग सत्रात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव, गणेश पाटील, विनोद सोनवणे, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, विनोद भोई, नरेश बडगुजर, राहुल पाटील, विजय भोई, सिद्धांत शिसोदे, संदीप धनगर, सुनील पाटील यांच्यासह अनेक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
यावेळी योग शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी नियमित योगासने केल्यास पोलिसांची शारीरिक चपळता वाढण्यास मदत होते, असे सांगितले. तर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी दिवसभराच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्यासाठी व्यायाम व योगाची गरज असल्याचे नमूद करत, सर्व पोलिसांनी नियमित योगाभ्यास करावा असे आवाहन केले.